Dehuroad crime News: देहूगावात दीड लाखांची घरफोडी

एमपीसी न्यूज – देहूगावात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून घरातून एक लाख 56 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना रविवारी (दि. 15) दुपारी चार ते सायंकाळी सात या कालावधीत माळीनगर, देहूगाव येथे घडली.

तानाजी विष्णू आर्दाळकर (वय 53, रा. माळीनगर, देहूगाव) यांनी याबाबत सोमवारी (दि. 16) देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे घर रविवारी दुपारी कुलूप लावून बंद होते. अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील बेडरूममधील लाकडी कपाटातून चोरट्यांनी एक लाख 56 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले.

देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.