Dehuroad Crime News : बेकायदेशीरपणे जमाव जमवल्या प्रकरणी 33 जणांवर गुन्हा दाखल

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – वाल्मिकी समाजाच्या मागण्यांसाठी आमदारांकडे निवेदन देण्यासाठी जाताना सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीरपणे जमाव जमवला. याबाबत 33 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (दि. 20) दुपारी साडेबारा वाजता सवाना चौकीसमोर देहूरोड येथे घडली.

सचिन भुंबक, आशीष पांडे, अंकुष भुंबक, आकाश भुंबक, सचिन वाघमारे, आनंद इंगळे, अक्षय कागडा, रोहित गोगालिया तसेच अन्य 20 ते 25 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसाद गज्जेवार यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाल्मिकी समाजाचे प्रतिनिधी सचिन भुंबक त्यांच्या अन्य साथीदारांसह मावळ तालुक्याचे आमदार सुनील शेळके यांना वाल्मिकी समाजाच्या मागण्यांबाबत निवेदन देण्यासाठी जात होते. मंगळवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास आरोपींनी देहूरोड येथील सवाना चौकीसमोर रस्त्यात बेकायदेशीरपणे जमाव जमावला. तसेच रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण करून कोरोनाच्या साथीचा प्रादुर्भाव वाढवण्यास पोषक वातावरण निर्माण केले.

तसेच तोंडाला मास्क न लावता, सुरक्षित अंतर न ठेवता कोरोना आजाराचा प्रसार होण्यास मदत केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस नाईक गेंगजे तपास करीत आहेत.

दरम्यान, या संदर्भात माहिती अधिकार कार्यकर्ते श्रीजीत रमेशन यांनी संबंधित प्रकार उघडकीस आणला होता. तसेच कोरोना संकटकाळात बेकायदेशीर जमाव जमविल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्याची मागणी पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.