Dehuroad Crime News : तलवारीने केक कापणे पडले महागात; बर्थडे बॉयसह तिघांना अटक

एमपीसी न्यूज – तलवारीने केक कापणे एका बर्थडे बॉयला चांगलेच महागात पडले आहे. पोलिसांनी बर्थडेबॉय आणि त्याच्या दोन मित्रांना अटक केली असून त्यांच्या आणखी एका मित्राच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

निखिल रेणू रेड्डी (वय 24, रा. मेन बाजार, देहूरोड), शाकिब शौकत मोमीन (वय 21, रा. देहूरोड), अश्रफ मेहबूब शेख (वय 21, रा. मेन बाजार, देहूरोड), शाहरुख शेख (वय 20) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी निखिल, शाकिब आणि अश्रफ या तिघांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 31 जानेवारी रोजी रात्री सव्वा बारा ते पावणे एक वाजताच्या सुमारास मेन बाजार, देहूरोड येथे घडली. आरोपी निखिल याचा वाढदिवस होता. त्यावेळी त्याने तलवारीने केक कापला. दरम्यान एकाने हा सर्व प्रकार व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद केला.

याबाबत देहूरोड पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी निखिल याला ताब्यात घेतले. त्याचा मोबाईल फोन तपासला असता त्यात तलवारीने केक कापल्याचे व्हिडीओ आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी निखिल आणि त्याच्या दोन साथीदारांना अटक करून त्यांच्या विरोधात शस्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.