Dehuroad Crime News : दलित महिलेवर जनावरांच्या गोठ्यात सामूहिक बलात्कार ; चौघांना अटक, दोघे फरार

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – दलित महिलेवर जनावरांच्या गोठ्यात सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी चार आरोपींना देहूरोड पोलिसांनी अटक केली असून दोन आरोपी फरार आहेत.

जानेवारी 2021 ते 31 मे 2021 या कालावधीत लेखा फार्मरोडवरील स्मशानभूमीसमोर आरोपींच्या कारमध्ये तसेच शितळानगर नंबर 1, मामुर्डी (ता. हवेली) येथील जनावरांच्या गोठ्यात हा प्रकार घडला.

याप्रकरणी वीस वर्षीय पीडित दलित महिलेने आज (बुधवारी, दि.2) देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आरोपींविरोधात भारतीय दंड विधान, कलम 342, 376 (1), 376 (ड), 377, 323, 504, 506, 120 (ब), आय.टी ॲक्ट 67, अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम कलम 3 (1) (12) या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्यानुसार आरोपी नोमान उर्फ आरबाज जावेद खान (वय 19) सुलतान उर्फ मुश्ताक सलीम सय्यद (वय 32), रियाज ऊर्फ मन्नन जावेद खान (वय 19, सर्व रा. शितळानगर, मामुर्डी, देहूरोड) व सोहेल शेरअली पिरजादे (वय 21, आंबेडकर नगर, देहूरोड) यांना अटक करण्यात आली आहे. तर, आरोपी हमीद जावेद खान, सोन्या रशीद खान हे दोघे फरार आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक आरोपी मुश्ताक सय्यद याने फिर्यादी महिला व आरोपी आरबाज खान यांचा शारीरिक संबंध करतानाचा व्हीडिओ शुट केला व तो व्हायरल करण्याची धमकी देत फिर्यादी महिलेवर बलात्कार केला. इतर आरोपींनी देखील संबंधित व्हीडिओ व्हायरल करण्याची धमकी देत वेळोवेळी जबरदस्तीने बलात्कार केला.

तसेच, आरोपी आरबाज खान याने फिर्यादी महिलेला मारहाण केली व घरच्यांना जीवे मारण्याची धमकी देत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

देहूरोड पोलीस अधिक तपास करत आहेत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.