Dehuroad crime News : धोकादायकरित्या मोठ्या सिलेंडरमधून लहान सिलेंडरमध्ये गॅस भरणाऱ्यावर गुन्हा

एमपीसी न्यूज – धोकादायकरित्या मोठ्या सिलेंडरमधून लहान सिलेंडरमध्ये गॅस भरणाऱ्या एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई देहूरोड पोलिसांनी सोमवारी (दि. 14) सकाळी साडेअकरा वाजता आंबेडकरनगर, देहूरोड येथे केली.

आकाश उत्तम जाधव (वय 20, रा. आंबेडकरनगर, देहूरोड) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई गणेश जगदाळे यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देहूरोड परिसरात गस्त घालत असताना पोलीस शिपाई जगदाळे यांना आंबेडकरनगर देहूरोड येथे एक तरुण 19 किलोच्या एका मोठ्या सिलेंडरमधून 4 किलो वजनाच्या एका लहान सिलेंडरमध्ये बेकायदेशीर आणि धोकादायाकरीत्या गॅस भरत असल्याचे आढळले.

त्यावरून त्याच्यावर कारवाई करत एक हजार 650 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच भारतीय दंड विधान कलम 285 नुसार आरोपी आकाश याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.