Dehuroad Crime News : अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत पैशांची मागणी

एमपीसी न्यूज – एका व्यक्तीला वारंवार फोन करुन त्याचा अश्लील व्हिडिओ बनवला. तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत त्याच्याकडे पैशांची मागणी केली. ही घटना 18 मे रोजी परंडवाल चौक- देहूगाव येथे घडली.

याप्रकरणी 8144171549, 7470465169 या मोबाईल क्रमांकधारक अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका व्यक्तीने गुरुवारी (दि. 20) देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात आरोपीने वेगवेगळ्या नंबरवरून फिर्यादी व्यक्तीला मेसेज करून फिर्यादीचा अश्लील व्हिडिओ तयार केला. तो व्हिडिओ व्हाट्सअपवर पाठवून धमकी देऊन पैशांची मागणी केली. पैसे दिले नाही तर व्हिडीओ सोशल मीडियावर तसेच फिर्यादी यांच्या मित्रांमध्ये व्हायरल करण्याची धमकी दिली.

देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.