Dehuroad Crime News : पिकअप अडवून चालकाला बेल्टने मारहाण; तोडफोड करून पिकअपचे नुकसान

0

एमपीसी न्यूज – पिकअपला दुचाकी आडवी लावून पिकअप अडवले. त्यानंतर पिकअप चालक आणि मालक यांना बेल्टने मारहाण केली. तसेच तोडफोड करून पिकअपचे नुकसान केले. ही घटना रविवारी (दि. 21) रात्री साडेआठ वाजता निगडी-देहूरोड रोडवर पुनागेट हॉटेलजवळ घडली.

अनिलकुमार रामनिवास शर्मा (वय 27, रा. निगडी), विकासकुमार विजयसिंग जांगडा (वय 26) अशी मारहाण झालेल्यांची नावे आहेत. याबाबत अनिलकुमार यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मोन्या उर्फ राहुल शंकर आठवाल (वय 19), शेखर गणेश शिंदे (वय 21), निखिल संदीप धोत्रे, प्रशांत गोविंद खरात (वय 24), राज (पूर्ण नाव माहिती नाही), अभिजित दाभाडे (सर्व रा. निगडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शर्मा यांचे पिकअप (एम एच 14 / जे एल 0586) आहे. त्यावर विकासकुमार जांगडा हे चालक म्हणून काम करतात. रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास फिर्यादी त्यांच्या पिकअपमधून निगडीकडून देहूरोडच्या दिशेने जात होते. दत्तनगर रोडने जात असताना रस्त्याच्या डाव्या बाजूला एक कार उभी होती. तिला वाचवण्यासाठी चालक विकासकुमार यांनी पिकअप उजवीकडे वळवले. त्यानंतर त्यांच्या समोरुन येणाऱ्या मोपेड दुचाकीवरील दोघांनी फिर्यादी यांचे पिकअप अडवले.

फिर्यादी आणि त्यांच्या चालकाला शिवीगाळ करून हाताने व कमरेच्या बेल्टने मारहाण करून जखमी केले. त्यानंतर पिकअपवर दगड मारून पिकअपचे 30 हजारांचे नुकसान केले. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.