Dehuroad Crime News : शिवीगाळ केल्याचा जाब विचारणाऱ्या तरूणाला रिव्हॉल्वरचा धाक

एमपीसी न्यूज – तरुणाला शिवीगाळ करून जाणाऱ्या पाच जणांना शिवीगाळ केल्याचा जाब विचारला. या कारणावरून पाच जणांनी जाब विचारणाऱ्या तरुणाला रिव्हॉल्वरचा धाक दाखवून पुन्हा शिवीगाळ केली. ही घटना बुधवारी (दि. 7) सायंकाळी  साडे पाच वाजताच्या सुमारास रावेत येथील शिंदे वस्तीमध्ये घडली.

रामेश्वर संभाजी भोंडवे (वय 30, रा. शिंदेवस्ती, रावेत) यांनी याबाबत देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनिल हुलावळे व त्याच्या चार साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बुधवारी दुपारी कार (एमएच 14 / एचवाय 8788) मधून आले. त्यांनी फिर्यादी भोंडवे आणि स्वप्निल केंजळे यांना शिवीगाळ केली. त्यानंतर आरोपी निघून जात असताना फिर्यादी यांनी आरोपींना शिंदे वस्ती चौकात अडवले. ‘तुम्ही आम्हाला का शिवीगाळ केली’, असा फिर्यादी यांनी जाब विचारला.

यावरून आरोपी अनिल आणि त्याच्या चार साथीदारांनी फिर्यादी यांना धक्काबुक्की केली. तसेच एकाने फिर्यादी यांच्या छातीला रिवॉल्वर सारखे हत्यार लावले आणि पुन्हा शिवीगाळ केली.

देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.