Dehuroad Crime News : देहूगावात पाच लाखांची घरफोडी, सोने व रोकड लंपास

एमपीसी न्यूज – देहुगावात 4.70 लाखांची घरफोडी झाल्याचे उघडकीस आले आहे. चोरटयांनी दरवाजाचा कोयंडा तोडून घराच्या बेडरुममधून सोने व रोख रक्कम चोरुन नेली. गुरुवारी (दि. 4) देहूगाव पोस्ट ऑफिस जवळील प्रदक्षिना सोसायटीत ही घटना घडली.

याप्रकरणी वर्षा प्रशांत वहिले ( वय 43, रा. प्रदक्षिना सोसायटी, देहूगाव ) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि. 5) फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध देहूरोड पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे घर बंद असताना दरवाज्याचा कोयंडा तोडून चोरटे घरात शिरले. चोरट्यांनी बेडरुममधील 4.70 लाख किंमतीचे सोने व रोख रक्कम चोरुन नेली आहे.

अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक रामेकर करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.