Dehuroad crime News : चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या माजी उपाध्यक्षाला अटक

एमपीसी न्यूज – एका उदघाटन समारंभात नागरिकांना बेकायदेशीरपणे एकत्र बोलावून चिथावणीखोर भाषण केले. तसेच व्यापारी वर्गात तेढ निर्माण होऊन शत्रुत्व वाढीस लागेस असे भाष्य केल्याप्रकरणी पोलिसांनी देहूरोड  कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या माजी उपाध्यक्षाला अटक केली आहे.
अमिन शेख (रा. देहूरोड, मेन बाजार) असे अटक केलेल्या कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या माजी उपाध्यक्षाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख याने देहूरोड मधील महात्मा फुले भाजी मंडईमध्ये एका  उदघाटन कार्यक्रमात नागरिकांना बेकायदेशीरपणे एकत्र जमवून राजकीय पक्ष व व्यापारी वर्गात तेढ निर्माण होईल असे चिथावणीखोर भाषण केले. यामुळे व्यापारी वर्गात तेढ निर्माण होऊन त्यांच्यातील शत्रुत्व वाढीस लागेल, असे वातावरण निर्माण झाले.

याच कार्यक्रमात शेख याने राजकीय व सामाजिक क्षेत्रात काम करणारे तसेच व्यापारी वर्गातील लोकांना धमकी व शिवीगाळ करून सामाजिक एकोपा टिकण्यास बाधक वर्तन केले. पोलिसांनी शेख याला अटक केली.
देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.