Dehuroad crime News : दुप्पट पैसे देण्याच्या आमिषाने एकाची सात लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – दुप्पट पैसे देण्याचे आमिष दाखवून एकाची सात लाख 7 हजारांची फसवणूक केल्याबाबत देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 12 मार्च 2018 पासून 7 फेब्रुवारी 2020 या कालावधीत घडला. याबाबत 14 जानेवारी 2021 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केदार सुरेश देशपांडे (वय 49, रा. गणेश तलावाजवळ, निगडी) यांनी याबाबत देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चंद्रकिरण आर. नंदा (रा. बिजलीनगर, चिंचवड) आणि त्याच्या साथीदाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी देशपांडे यांना दुप्पट पैसे देण्याचे आमिष दाखवले. देशपांडे यांचा विश्वास संपादन करून आरोपींनी 12 मार्च 2018 पासून 7 फेब्रुवारी 2020 या कालावधीत 7 लाख 7 हजार रुपये घेतले.

पैसे घेतल्यानंतर आरोपींनी देशपांडे यांना दुप्पट पैसे दिले नाहीत. तसेच देशपांडे यांनी दिलेले 7 लाख 7 हजार रुपये देखील परत न देता फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.