Dehuroad Crime News : तलवार बाळगून दहशत माजवणा-यास बेड्या

एमपीसी न्यूज – सोनेरी रंगाची लोखंडी तलवार बाळगून मोठमोठ्याने आरडाओरडा करून लोकांमध्ये दहशत माजवली. या प्रकरणी देहूरोड पोलिसांनी एकाला अटक केली. ही कारवाई शुक्रवारी (दि. 3) रात्री साडेदहाच्या सुमारास आंबेडकरनगर येथे करण्यात आली.

रूपेश अशोक जाधव (वय 43, रा. आंबेडकरनगर, देहूरोड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस कर्मचारी स्वप्निल चंद्रकांत साबळे यांनी या प्रकरणी शनिवारी (दि. 4) देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रूपेश जाधव हा तलवार बाळगून परिसरात मोठमोठ्याने आरडाओरडा करत असल्याची माहिती देहूरोड पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी शुक्रवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास देहूरोड येथील आंबेडकरनगर येथे तलवार बाळगून आरडाओरडा करत दहशत माजवणारा आरोपी रूपेश याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून लोखंडी धातूची सोनेरी रंगाची तलवार जप्त करण्यात आली आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.