Dehuroad Crime News : गोठ्यात बांधलेली हरियाणी म्हैस चोरून नेली

एमपीसी न्यूज – गोठ्यात बांधलेली हरियाणी जातीची म्हैस अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना बुधवारी (दि. 14) रात्री दोन ते पावणे पाच या कालावधीत एम. बी. कॅम्प, देहूरोड येथे घडली.

अजय ओमप्रकाश बिडलान (वय 32, रा. एमबी कॅम्प, देहूरोड) यांनी याबाबत देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांची म्हैस 14 जुलै रोजी गोठ्यात बांधली होती. मध्यरात्री दोन ते पावणे पाच वाजताच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी 15 हजार रुपये किमतीची म्हैस चोरून नेली. म्हैस चोरून नेत असताना त्याची फिर्यादी यांना जाराशीही चाहूल लागली नाही.

देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.