Dehuroad Crime News : रेमडेसिवीर इंजेक्शनची विक्री करणाऱ्या एकाला अटक

एमपीसी न्यूज – रेमडेसिवीर इंजेक्शन बेकायदेशीरपणे विक्री करणाऱ्या एका तरुणाला देहूरोड पोलिसांनी अटक केली. रविवारी (दि. 25) रात्री सेंट्रल चौक देहूरोड येथे ही कारवाई करण्यात आली.

सुनील लहू राठोड (वय 24, रा. केशवनगर, वडगाव मावळ. मूळ रा. बीड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलीस शिपाई किशोर बोंडे यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोविड 19 संक्रमित रुग्णांना उपचारासाठी लागणारे रेमडेसिवीर इंजेक्शन प्रशासनाने खासगी विक्रीसाठी बंद केले आहे. रविवारी रात्री पावणे नऊ वाजता देहूरोड पोलिसांनी सेंट्रल चौकात कारवाई करून आरोपी सुनील राठोड याला ताब्यात घेतले. तो तीन हजार 490 रुपये किमतीचे रेमडेसिवीर इंजेक्शन बेकायदेशीरपणे विकत होता. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.