Dehuroad crime News : मुलगी झाल्याच्या कारणावरून विवाहितेचा छळ

महिलेच्या पगाराचे सर्व पैसे घेऊन, तिच्या नावावर कर्ज काढून तिचा विश्वासघात देखील केला.

एमपीसी न्यूज – मुलगी झाल्याच्या कारणावरून सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छळ केला. तसेच विवाहित महिला रंगाने काळी असल्यावरून देखील तिला वारंवार त्रास दिला. महिलेच्या पगाराचे सर्व पैसे घेऊन, तिच्या नावावर कर्ज काढून तिचा विश्वासघात देखील केला. ही घटना 13 डिसेंबर 2009 पासून 6 सप्टेंबर 2020 या कालावधीत देहूरोड येथे घडली.

पती समीर राजीव नाईकवाडी, सासरे राजीव अयुब नाईकवाडी (वय 62), लतिका राजीव नाईकवाडी (वय 60, तिघे रा. कोहिनूर सदनिका, देहूरोड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याप्रकरणी पीडित विवाहितेने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती समीर याने फिर्यादी यांच्या नोकरीचा सर्व पगार स्वतःच्या हौस आणि मजेसाठी वापरला.

सासू आणि सासरे यांनी विवाहित महिला रंगाने काळी असल्याने तसेच तिला मुलगी झाल्याच्या कारणावरून शिवीगाळ करून टोमणे मारले. विवाहितेचे स्त्रीधन काढून घेऊन तिचा छळ केला.

पती समीर याने विवाहितेला कर्ज काढायला लाऊन कार खरेदी केली. तिचा वापर पतीने स्वतःसाठीच केला. तसेच विवाहितेची संमती न घेता परस्पर कार गहाण ठेऊन तिचा विश्वासघात केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.