Dehuroad crime News : एमबी कॅम्प परिसरात एकावर खुनी हल्ला

एमपीसी न्यूज – एमबी कॅम्प, देहूरोड येथे सहा जणांच्या टोळक्याने एकावर प्राणघातक हल्ला केला. ही घटना गुरुवारी (दि. 29) दुपारी पाच वाजता एमबी कॅम्पच्या सार्वजनिक पाण्याच्या नळाजवळ घडली.

दीपक स्वामी (वय 22), सोना स्वामी (दोघे रा. गांधीनगर, देहूरोड), विजय स्वामी (वय 20), प्रशांत स्वामी (वय 20), प्रकाश स्वामी (वय 20), किशन शिवा शंमुगम (वय 22, रा. विकासनगर, देहूरोड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत चित्रा वीरा स्वामी (वय 30, रा. एमबी कॅम्प, देहूरोड) यांनी शुक्रवारी (दि. 30) देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वीरा चिन्नास्वामी असे जखमी व्यक्तीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी पाच वाजताच्या सुमारास आरोपींनी बेकायदेशीरपणे हत्यारे घेऊन परिसरात दहशत निर्माण केली.

त्यानंतर फिर्यादी यांचे पती वीरा यांना ‘तुझ्यामुळे आम्हाला एमबी कॅम्प परिसर सोडावा लागला आहे. आज तुला जिवंत सोडणार नाही’ असे म्हणत त्यांच्यावर लोखंडी कोयता, रॉड, बिअरच्या बाटल्या, सिमेंटचा पत्रा, दगड, विटांनी मारून प्राणघातक हल्ला केला.

देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.