Dehuroad crime News : सिमेंटच्या 500 पोत्यांची कंपनीच्या परस्पर विक्री

संजय हा ब्रज कॅरिअर एलएलपी या कंपनीच्या ट्रकवर चालक म्हणून काम करत आहे. डिलिव्हरी देण्यासाठी त्याच्या ट्रकमध्ये 500 पोती सिमेंट भरण्यात आले.

एमपीसी न्यूज – डिलिव्हरीसाठी भरलेला 500 पोती सिमेंटचा माल ट्रक चालकाने परस्पर विकून कंपनीची फसवणूक केली. याबाबत ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा प्रकार 18 ऑगस्ट रोजी सकाळी सहा ते 23 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजताच्या कालावधीत कात्रज, कोंढवा येथे घडला.

संजय नुरा राठोड (रा. संकाळा, ता. बामणी, जि. परभणी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी ट्रक चालकाचे नाव आहे. याप्रकरणी नितीन रामकृष्ण शेळके (वय 33, रा. कामोठे, नवी मुंबई) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संजय हा ब्रज कॅरिअर एलएलपी या कंपनीच्या ट्रकवर चालक म्हणून काम करत आहे. डिलिव्हरी देण्यासाठी त्याच्या ट्रकमध्ये 500 पोती सिमेंट भरण्यात आले.

संजय याने कंपनीच्या परस्पर 1 लाख 25 हजार रुपयांचे 500 पोती सिमेंट विकले. याबाबत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.