Dehuroad Crime News : टेम्पोच्या धडकेत पादचारी वृद्ध ठार

एमपीसी न्यूज – रस्त्याने पायी चालत जात असलेल्या वृद्ध व्यक्तीला भरधाव वेगात जाणा-या एका टेम्पोने धडक दिली. त्यात वृद्धाचा मृत्यू झाला. हा अपघात 23 फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजता तळेगाव ते देहूरोड या मार्गावर गांधीनगर, देहूरोड येथे घडला.

योगेंद्र राम मूर्ती यादव (वय 60) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत कृष्णचंद तप्पे यादव (वय 51, रा. विकासनगर, देहूरोड) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी मारुती महादेव बंडगर (वय 37, रा. कुपवाड, मिरज, जि. सांगली) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत यादव हे गांधीनगर येथे तळेगाव – देहूरोड या रस्त्यावरून पायी चालत जात होते. सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास एक टेम्पो (एम एच 11 / एल एल 4437) भरधाव वेगात आला. या टेम्पोने यादव यांना जोरात धडक दिली. त्यात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने यादव यांचा मृत्यू झाला. याबाबत टेम्पो चालक मारुती बंडगर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.