Dehuroad crime News : लग्नात हुंडा दिला नाही म्हणून विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज – लग्नात हुंड्याचे पैसे दिले नाहीत या कारणावरून सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छळ केला. तसेच विवाहितेला आणि तिच्या एक वर्षाच्या मुलीला घराबाहेर काढले. अशी फिर्याद विवाहितेने दिली आहे. हा प्रकार 8 फेब्रुवारी 2018 पासून 21 सप्टेंबर 2020 या कालावधीत देहूरोड परिसरात घडला आहे.

याप्रकरणी 22 वर्षीय विवाहितेने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी श्रीराम निवास यादव, सरोज देवी, अजय यादव, विजय कुमार यादव यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या माहेरच्या लोकांनी लग्नाच्या वेळी हुंड्यासाठी पैसे दिले नाहीत, या कारणावरून आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादी महिलेला शिवीगाळ करून हाताने व लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली.

तसेच फिर्यादी विवाहितेला आणि तिच्या एक वर्षाच्या मुलीला घराबाहेर काढून तिचा शारीरिक व मानसिक छळ केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.