Dehuroad Crime News: ऑनलाईन विवाह नोंदणी संकेतस्थळावरील ओळखीतून महिलेवर बलात्कार

एमपीसी न्यूज – ‘शादी डॉट कॉम’ या ऑनलाईन विवाह नोंदणी संकेतस्थळावर ओळख झालेल्या व्यक्तीने लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार केला. ही घटना सन 2016 ते 14 मार्च 2021 या कालावधीत तळवडे येथे घडला.

विक्रांत विष्णू स्वाईन (वय 38, रा. रावेत) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. याबाबत पीडित महिलेने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी यांची शादी डॉट कॉम या ऑनलाईन विवाह नोंदणी संकेतस्थळावरून ओळख झाली. त्यानंतर दोघे भेटू लागले. आरोपीने महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला.

महिलेसोबत विवाह न करता तिची फसवणूक करून ‘तुला काय करायचे ते कर’ अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.