Dehuroad Crime News : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार

एमपीसी न्यूज – लग्नाचे आमिष दाखवून तरुणीला तरुणीला ठिकठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. हा प्रकार 12 मे 2015 ते 28 नोव्हेंबर 2020 या कालावधीत देहूगाव, लोणी काळभोर आणि तळेगाव येथे घडला.

सुमित सुशांत नाईक (वय 24, रा. माळवाडी, देहूगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पीडित तरुणीने 20 एप्रिल रोजी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुमित याने पीडित तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिला दुचाकीवरून देहूगाव, लोणी काळभोर आणि तळेगाव येथे नेऊन वारंवार तिच्यावर बलात्कार केला. तसेच तिच्याशी विवाह न करता तिची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.