Dehuroad Crime News : हॉस्पिटलमध्ये मृत्यू झालेल्या रुग्णाच्या नातेवाईकांचा रुग्णालयात राडा; वॉर्ड बॉय, स्वीपर, वॉचमन यांना मारहाण

एमपीसी न्यूज – हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान एका रुग्णाचा मृत्यू झाला. या कारणावरून मृत्यू झालेल्या रुग्णाच्या नातेवाईकांनी हॉस्पिटलमध्ये राडा घातला. नातेवाईकांनी हॉस्पिटलमधील वॉर्डबॉय, स्वीपर आणि वॉचमनला मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. 19) देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटलमध्ये घडली. 

सुरज कटारे, नागेश अवघडे, रामस्वामी राजल्ले, सुरज डेव्हिड, योगेश डेव्हिड, बंटी कटारिया यांच्यासह 25 ते 30 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत डॉ. श्रीनिवास चाटे यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर अर्जुन कटारे (वय 28) या रुग्णावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूची माहिती समजताच आरोपींनी हॉस्पिटलच्या आवारात बेकायदा जमाव जमवला.

मृत सागरचा चुलत भाऊ सुरज कटारे याने आणि त्याच्या 10 ते 12 साथीदारांनी हॉस्पिटल मधील वॉर्डबॉय ओंकार राजे, स्वीपर ऋषीकेश श्रीधर पिंजन, वॉचमन कुणाल वाघमारे यांनी मारहाण केली. हॉस्पिटलच्या रूमची तोडफोड करून डॉक्टर करत असलेल्या शासकीय कामात आरोपींनी अडथळा निर्माण केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.