Dehugaon Crime News : दहा वर्षीय मुलीसोबत अश्लील चाळे

एमपीसी न्यूज – पाणी आणण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीला दुचाकीवरून नेऊन तिच्यासोबत अश्लील चाळे केल्याचा प्रकार देहूगावात उघडकीस आला आहे. याबाबत एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आतिष उर्फ बाळा आत्माराम चव्हाण (वय 21, रा. देहूगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हा प्रकार शनिवारी (दि. 13) रात्री आठ ते साडेआठ वाजताच्या कालावधीत देहूगावातील सेटल कंपनीच्या जवळ झाडांमध्ये घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या दहा वर्षीय मुलीला पाणी आणण्याच्या बहाण्याने आरोपीने त्याच्या मोपेड दुचाकीवरून नेले. देहूगावात सेटल कंपनीच्या जवळ असलेल्या झाडांमध्ये नेऊन तिच्यासोबत आरोपीने अश्लील चाळे केले. त्यानंतर आरोपीने घडलेला प्रकार घरी न सांगण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.