Dehuroad crime news : सोन्याच्या भिशीच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक करणारा सराईत गुन्हेगार गुन्हे शाखेच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज – सोन्याच्या भिशीच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट पाचने अटक केली आहे. हा गुन्हेगार मोक्कासह चार फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये फरार होता.

संजय मारुती कारले (वय 42, रा. अनिकेत अपार्टमेंट, फ्लॅट नं 05, यशवंतनगर, तळेगाव दाभाडे) असे अटक केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.

गुन्हे शाखा युनिट पाचचे पोलीस कर्मचारी दत्तात्रय बनसुडे आणि सावन राठोड यांना माहिती मिळाली की, तळेगाव दाभाडे, देहूरोड परिसरात सोन्याच्या भिशीच्या नावाखाली फसवणुकीचे गुन्हे करुन फरार झालेला आरोपी संजय कारले हा त्याच्या तळेगाव येथील घरी येणार आहे.

_MPC_DIR_MPU_II

या माहितीनुसार पोलिसांनी एक पथक तयार करून आरोपीच्या घराच्या परिसरात सापळा लावला. आरोपी संजय त्याच्या घरी चालत येत असताना त्याला पोलिसांची चाहूल लागली. त्यामुळे तो पळून जाण्याचा प्रयत्न करीत होता. पोलिसांनी त्याला शिताफीने पकडले.

पोलिसांच्या चौकशीत सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे त्याला गुन्हे शाखेच्या कार्यालयात आणून त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने सोन्याच्या भिशीच्या नावाखाली तळेगाव आणि देहूरोड परिसरात लोकांची फसवणूक केल्याचे सांगितले.

आरोपी संजय देहूरोड पोलीस ठाण्यातील फसवणुकीच्या तीन, तर तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यातील मोक्कासह फसवणुकीच्या एका गुन्ह्यात फरार होता. त्याला अटक करून पुढील कारवाईसाठी देहूरोड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) राजाराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट पाचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोमारे व पोलीस कर्मचारी धनराज किरनाळे, दत्तात्रय बनसुडे, संदिप ठाकरे, मयुर वाडकर, गणेश मालुसरे, ज्ञानेश्वर गाडेकर,श्यामसुंदर गुट्टे, धनंजय भोसले, स्वामीनाथ जाधव, फारुक मुल्ला, सावन राठोड, नितीन बहिरट, भरत माने, राजकुमार इघारे, दयानंद खेडकर, गोपाळ ब्रम्हांदे व राजेंद्र कदम यांच्या पथकाने केली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.