Dehuroad crime News : वर्कशॉपच्या कंपाउंडचा पत्रा उचकटून दोन लाखांच्या साहित्याची चोरी

0

एमपीसी न्यूज – वर्कशॉपच्या कंपाउंडचा पत्रा उचकटून अज्ञात चोरट्यांनी कंपनीतून एक लाख 97 हजार 906 रुपयांचे साहित्य चोरून नेले. ही घटना 14 सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकरा वाजता देहू आळंदी रोडवर भारत वजन काट्यासमोर उघडकीस आली.

विशाल प्रभाकर इंगळे (वय 29, रा. परंडवाल चौक, देहूरोड) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 13 सप्टेंबर रात्री सव्वा दहा ते 14 सप्टेंबर सकाळी साडेअकरा वाजताच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी यांच्या कंपनीच्या कंपाउंडचा पत्रा उचकटून कंपनीत प्रवेश केला.

कंपनीतून 73 हजार 112 रुपये किमतीचे गम फोल्डिंग युनिट 65 नग, 26 हजार 815 रुपयांचे एस एस प्लॅट तीन हजार 439 नग, 9 हजार 475 रुपयांचे वाश बेसिन, 87 हजार 906 रुपयांचे एम एस स्टेनलेस स्टील प्लेट असा एकूण 1 लाख 97 हजार 906 रुपयांचा ऐवज चोरून नेला.

देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.