Dehuroad Crime News : विवाहितेच्या छळ प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – लग्नानंतर वारंवार पैशांची मागणी करून विवाहितेचा छळ केला. याबाबत पती, सासू आणि सासरे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 7 नोव्हेंबर 2019 ते 25 ऑक्टोबर 2020 या कालावधीत राणी कंपनी, तळवडे येथे घडला.

पती राहुल प्रमोद नागमोडे (वय 32), सासू मीना प्रमोद नागमोडे (वय 55), सासरे प्रमोद नागमोडे (वय 65, सर्व रा. राणी कंपनी, तळवडे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पीडित विवाहितेने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून विवाहीतेकडे लग्नानंतर वारंवार पैसे आणण्याची मागणी केली. यावरून आरोपींनी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.