Dehuroad Crime News: देहूरोड परिसरात दोन घरफोड्या, वाकड हिंजवडीमध्ये तीन चोऱ्या

एमपीसी न्यूज – देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत शिंदे वस्ती, रावेत आणि देहूगाव येथे दोन घरफोड्या झाल्या. यामध्ये चोरट्यांनी 72 हजारांचा ऐवज चोरून नेला. तर हिंजवडी परिसरात एक आणि वाकड परिसरात दोन चोरीच्या घटना घडल्या. यामध्ये चोरटयांनी 70 हजारांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. याप्रकरणी मंगळवारी (दि. 9) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

आशिष राजेश अगरवाल (वय 31, रा. देहूगाव) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. रविवारी (दि. 7) सकाळी पावणे सात ते साडेआठ वाजताच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी यांच्या घरातून एक लॅपटॉप आणि दोन मोबाईल फोन असा एकूण 40 हजारांचा ऐवज चोरून नेला.

मयूर सुपडू पगार (वय 26, रा. शिंदे वस्ती, रावेत) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी यांच्या दिगंबर डेअरी या दुकानाच्या मागील बाजूचा लोखंडी दरवाजा उचकटून आत प्रवेश केला. दुकानातून 32 हजार रुपये रोख रक्कम चोरटयांनी चोरून नेली. दोन्ही गुन्ह्यांचा तपास देहूरोड पोलीस करीत आहेत.

सुसगाव येथे अज्ञात चोरट्यांनी घराची कडी उघडून घरातून दोन मोबाईल फोन आणि एक पर्स असा एकूण 13 हजार 100 रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी एका महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार मंगळवारी (दि. 9) सकाळी साडेसहा ते साडेआठ वाजताच्या कालावधीत घडला.

शिवा नागेश परीट (वय 29, रा. देहूरोड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी हे काळेवाडी येथील डीमार्ट स्टोअर येथे काम करतात. मंगळवारी (दि. 9) दुपारी दोन वाजता डी मार्ट स्टोअर येथे सहा हजार 900 रुपयांचा माल सील तोडून चोरून नेताना दोन महिला आढळून आल्या. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वैभव तानाजी भिसे (वय 23, रा. किवळे) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी यांनी त्यांची 50 हजार रुपये किमतीची दुचाकी ताथवडे येथील एका कंपनीच्या पार्किंगमध्ये पार्क केली. अज्ञात चोरट्यांनी पार्किंगमधून दुचाकी चोरून नेली. हा प्रकार रविवारी (दि. 7) रात्री अकरा ते सोमवारी (दि. 8) पहाटे तीन वाजताच्या सुमारास घडला. दोन्ही गुन्ह्यांचा तपास वाकड पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.