Dehuroad Crime News : सैन्याकडून नष्ट केलेल्या शस्त्रांचे धातु चोरणाऱ्या दोन महिलांना अटक

0

एमपीसी न्यूज – सैन्याने नष्ट केलेल्या शस्त्रांचे लोखंडी आणि तांबे पितळेचे धातू चोरी करणाऱ्या दोन महिलांना अटक करण्यात आली आहे. ही घटना गुरुवारी (दि. 22) दुपारी 29 एफ ए डी ओल्ड डेपो, किन्हाईगाव देहूरोड येथे घडली.

_MPC_DIR_MPU_II

मीना विजय काळे (वय 60), सोनाली अविनाश भोसले (वय 30, दोघी रा. इंदिरानगर झोपडपट्टी, चिंचवड) अशी अटक केलेल्या महिलांची नावे आहेत. याबाबत गुलाबचंद शंकर शर्मा (वय 44) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 29 एफ ए डी ओल्ड डेपो, किन्हाईगाव येथे सैन्याने शस्त्र नष्ट केली आहेत. गुरुवारी दुपारी सव्वाबारा वाजताच्या सुमारास फिर्यादी शर्मा आणि त्यांचे सहकारी परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी दोन आरोपी महिला फायर रेंजच्या भिंतीचे लोखंडी गज कापून आत आल्या. त्यांनी सैन्याकडून नष्ट करण्यात आलेल्या लोखंडी व तांबे पितळ धातूची चोरी केली. याबाबत सैन्याने दोघींना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment