Dehuroad Crime News : देहूगावातील कंपनीत स्फोट होऊन दोन कामगारांचा मृत्यू

एमपीसी न्यूज – कंपनीत काम करताना थिनरच्या कॅन्डचा स्फोट झाला आणि त्यात दोन कामगार गंभीररीत्या भाजले. रुग्णालयात उपचार सुरु असतना दोन्ही कामगारांचा मृत्यू झाला. याबाबत कंपनी मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना 22 मार्च रोजी स्मित प्लाझा कंपनी देहूगाव येथे घडली असून याबाबत 8 एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निलेश सुभाष भोसले (वय 39, रा. मोशी) असे गुन्हा दाखल झालेल्या कंपनी मालकाचे नाव आहे. याबाबत पोलीस हवालदार बळीराम चव्हाण यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

विनोद बाळासाहेब शिंगण (वय 28, रा. इंदिरानगर, बिबवेवाडी, पुणे), मोंटूराम कुमार परशुराम (वय 19, रा. उत्तर प्रदेश) अशी मृत्यू झालेल्या आरोपींची नावे आहेत.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भोसले यांची देहूगाव येथे स्मित प्लाझा नावाची कंपनी आहे. 22 मार्च रोजी रात्री कामगार विनोद शिंगण आणि मोंटूराम परशुराम वेल्डिंगचे काम करत होते.

साडेसात वाजता कंपनीत काम करत असताना खाली ठेवलेल्या थिनर कॅन्डचा स्फोट झाला. त्यात विनोद आणि मोंटूराम हे दोघेही गंभीररीत्या भाजले. विनोद याला पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल केले. त्याचा 26 मार्च रोजी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला.

तर मोंटूराम याला गुजरात राज्यातील सुरज येथील रुग्णालयात दाखल केले होते. त्याचाही 1 एप्रिल रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. आरोपी कंपनी मालक निलेश भोसले याने कंपनीत कामगारांच्या संरक्षणाच्या दृष्टीने कोणतीही उपाययोजना केली नाही. आगीवर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा अद्यायावत केली नाही म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.’

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.