Dehuroad Crime News : तरुणाला विनाकारण शिवीगाळ, विटेने मारहाण; एकास अटक

0

एमपीसी न्यूज – विनाकारण शिवीगाळ करत असलेल्या व्यक्तीला त्याचा जाब विचारल्यावरून शिवीगाळ करणाऱ्या व्यक्तीने तरुणाला विटेने मारहाण केली. तसेच त्याला शिवीगाळ करत छपरावरून ढकलून दिले. ही घटना गुरुवारी (दि. 22) सकाळी गांधीनगर- देहूरोड येथे घडली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

हाजीमलंग उर्फ मोट्या रामनारायण कंदस्वामी (वय 42, रा. गांधीनगर, देहूरोड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पुरूमल कन्नत मूर्ती (वय 28, रा. गांधीनगर, देहूरोड) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हाजीमलंग याने फिर्यादी यांच्या घराकडे बघुन विनाकारण शिवीगाळ केली. त्याबाबत फिर्यादी यांनी हाजीमलंग याला शिवीगाळ का केली असे विचारले. त्यावरून हाजीमलंग याने फिर्यादी यांच्या डोक्यात वीट फेकून मारली.

तसेच त्यांना छपरावरून जोराने ढकलून दिले. यात फिर्यादी यांच्या डोक्याला, हाताला व पायाला गंभीर दुखापत झाली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment