_MPC_DIR_MPU_III

Dehuroad crime News: पिस्टल बाळगल्याप्रकरणी तरुणाला अटक

एमपीसी न्यूज – बेकायदेशीरित्या पिस्टल बाळगल्या प्रकरणी पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट पाचच्या पोलिसांनी एका तरुणाला अटक केली. त्याच्याकडून एक गावठी पिस्टल आणि बुलेट दुचाकी जप्त करण्यात आली आहे.

_MPC_DIR_MPU_IV

सिद्धेश्वर दयानंद कांबळे (वय 20, रा. जाधववाडी, चिखली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेचे पोलीस नाईक फारूक मुल्ला यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देहूरोड परिसरात गस्त घालत असताना पोलीस नाईक फारूक मुल्ला यांना माहिती मिळाली की, म्हस्के वस्ती, रावेत येथे बीआरटी रोडजवळ ‘हॉटेल स्पॉट 97’ या हॉटेलसमोर एक तरुण संशयितरित्या थांबला असून त्याच्याकडे पिस्टल आहे.

या माहितीनुसार पोलिसांनी परिसरात सापळा लावत शिताफीने सिद्धेश्वर कांबळे याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी लोखंडी पिस्टल आढळून आले.

पोलिसांनी 50 हजारांचे पिस्टल आणि 70 हजारांची बुलेट दुचाकी जप्त करत सिद्धेश्वर याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.