Dehuroad Crime News : कल्याण मटका चालवणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक

एमपीसी न्यूज – कल्याण मटका चालवणा-या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून एकास अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी (दि.09) आंबेडकर नगर, देहूरोड येथे ही कारवाई करण्यात आली.

नासिर बशीर शेख (वय 34, रा. देहूरोड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर आणखी एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल सचिन शेजाळ यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी कल्याण मटका चालवत होते. त्याच्याजवळून 15 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रामेकर करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.