Dehuroad Crime : हॉस्पिटलमध्ये डिपॉझिट भरण्यास सांगितल्यावरून नर्सला शिवीगाळ, सफाई कामगाराला मारहाण

एमपीसी न्यूज – हॉस्पिटलमध्ये डिपॉझिट भरण्यास सांगितल्याने एका व्यक्तीने नर्सला शिवीगाळ केली. तसेच सफाई कामगाराला मारहाण केली. याबाबत दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 26) सकाळी देहूरोड येथील बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटल येथे घडली.

सुरज महेंद्र भुंबक, महेंद्र भुंबक अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत रवी सुबैय्या नाडार (वय 48, रा. विकासनगर, देहूरोड) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे देहूरोड येथील बाबासाहेब आंबेडकर जनरल हॉस्पिटल या दवाखान्यात काम करतात. आरोपी महेंद्र याची पत्नी संगीता यांच्यावर बाबासाहेब आंबेडकर जनरल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. दरम्यान डॉक्टरांनी महेंद्रला डिपॉझिट भरण्यास सांगितले. त्यावरून त्याने दवाखान्यातील नर्स रुपाली रॉबर्ट यांना शिवीगाळ केली.

तर मुलगा सुरज याने दवाखान्यातील सफाई कामगार महेश सोमेश्वर यांना मारहाण केली. ‘तू पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली तर परत येऊन मारीन’ अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.