Dehuroad Crime : टेम्पोवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पो उलटला; चालकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – चालकाचे टेम्पोवरील नियंत्रण सुटल्यामुळे टेम्पो उलटला. यामध्ये टेम्पो चालकाचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. ही घटना 15 ऑक्टोबर रोजी पहाटे दोन वाजता घडली असून याबाबत 8 नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अरुण वसंत खंदारे (वय 35, रा. रहाटणी, काळेवाडी. मूळ रा. बुलढाणा) असे मृत्यू झालेल्या टेम्पो चालकाचे नाव आहे. याबाबत धनंजय गेनबा मुळीक (वय 44, रा. काळेवाडी. मूळ रा. सातारा) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत अरुण खंदारे हा टेम्पो (एम एच 12 / के पी 8698) घेऊन मुंबई-बेंगलोर महामार्गावरून भरधाव वेगात जात होता. किवळे ब्रिजवर आल्यानंतर अरुणचे टेम्पोवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे टेम्पो उलटून होऊन पुलाच्या कठड्यावर आदळला. यामध्ये चालक अरुण गंभीर जखमी झाला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.