Dehuroad Crime : फोन करण्याच्या बहाण्याने प्रवाशाचा घेतलेला मोबाईल फोन पळवला

एमपीसी न्यूज – कॉन्ट्रॅक्टरला फोन करायचा असल्याचे सांगून रिक्षातील प्रवाशाचा मोबाईल फोन रिक्षा चालकाने जबरदस्तीने हिसकावून घेतला. त्यानंतर रिक्षा चालक आणि त्याचा साथीदार प्रवाशाचा मोबाईल फोन घेऊन पसार झाले. ही घटना शुक्रवारी (दि. 27) रात्री साडेसात वाजता सेंट्रल चौक, देहूरोड येथे घडली.

नारायण प्रभाकर गोकरे (वय 32, रा. तळेगाव दाभाडे) यांनी याबाबत शनिवारी (दि. 28) तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी एम एच 14 / जी सी 1621 या क्रमांकाच्या रिक्षावरील चालक आणि त्याच्या साथीदारावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गोकरे आरोपीच्या रिक्षातून देहूरोड येथे आले. सेंट्रल चौकात आल्यानंतर रिक्षा चालक आरोपी ‘मला माझ्या कॉन्ट्रॅक्टर सोबत बोलायचे आहे. मला तुमचा फोन द्या’ असे म्हणाला. त्यानंतर रिक्षा चालक आणि त्याच्या साथीदाराने मिळून गोकरे यांचा 12 हजार रुपयांचा मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून घेतला आणि पळून गेले. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.