Dehuroad Crime : गोठ्यात बांधलेली मु-हा म्हैस चोरट्यांनी पळवली

एमपीसी न्यूज – विकासनगर देहूरोड येथे गोठ्यात बांधलेली मु-हा जातीची म्हैस अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे. ही घटना 1 ऑक्टोबर रोजी पहाटे घडली आहे.

शहरात जनावरांच्या चोरीच्या घटना देखील वाढत आहेत. 29 सप्टेंबर रोजी आळंदी मध्ये दोन गायी चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला होता.

अजित जयवंत चव्हाण (वय 50, रा. विकासनगर, किवळे, देहूरोड) यांनी याबाबत देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चव्हाण यांच्या घराजवळ जनावरांचा गोठा आहे. अज्ञात चोरट्यांनी 1 ऑक्टोबर रोजी सकाळी सव्वा सहा वाजताच्या सुमारास गोठ्यातून 20 हजार रुपये किमतीची मु-हा जातीची म्हैस चोरून नेली. त्यानंतर चव्हाण यांनी त्यांच्या म्हशीचा परिसरात शोघ घेतला. मात्र म्हैस मिळून न आल्याने त्यांनी पोलिसात धाव घेत गुन्हा नोंदवला आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

29 सप्टेंबर रोजी पहाटे आळंदी परिसरात केळगाव येथून गोठ्यात बांधलेल्या दोन गायी चोरून नेल्या. याबाबत आळंदी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. शहरात वाहनचोरी, घरफोडी, जबरी चोरी या घटना वाढत असताना आता जनावरांच्या चोरीच्याही घटना सामोर येत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.