Dehuroad : कर्णबधिर मुलींनी बांधल्या सैनिकांना पर्यावरणपूरक राख्या

एमपीसी न्यूज – मॉडर्न हायस्कुल निगडी येथील कर्णबधिर आणि आरएसपी पथकाच्या मुलींनी देहूरोड CQA (SV ) डेपोमध्ये सैनिक आणि अधिकाऱ्यांना राख्या बांधून रक्षाबंधन साजरे केले. सर्व जनता तुम्हा सैनिकांच्या मागे सदैव ठामपणे उभे असल्याची भावना यावेळी मुलींनी व्यक्त केल्या.

जवानाविषयी असलेल्या आदर भावनेमुळे मुलींनी स्वतः कागदापासून पर्यावरण पूरक राख्या बनविल्या होत्या. परकीय शत्रूपासून देशाचे रक्षण करण्याबरोबरच , सांगली कोल्हापूर मधील पुरस्थितीमध्ये देखील जवानांनी लोकांचे प्राण वाचविले आहेत. आपण जवानांच्या त्यागामुळेच देशात सुरक्षित असल्याचे मनोगत मुलींनी व्यक्त केले.

_MPC_DIR_MPU_II

यावेळी देहूरोड डेपोतील कर्नल एम.एस. सोनी यांनी या कर्णबधिर मुलीचे विशेष कौतुक केले. कर्नल सोनी म्हणाले दिव्यांग व्यक्तींना देवाने एक अदभुत क्षमता दिलेली असते. दिव्यांग मुलींनी आपली क्षमता ,आवड ओळखून आयुष्य उज्वल करावे.दिव्यांग मुलींचे कलागुण पाहून ‘बेटी बचाओ , बेटी पढाओ’ अभियान सार्थ असल्याची भावना व्यक्त केली.यावेळी कर्नल एम. एस. सोनी यांनी दिव्यांग मुलींना भावी उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.तसेच सरंक्षण क्षेत्रातील अनेक संधींची देखील माहिती दिली.देहूरोड डेपोतील युनियन प्रेसिडेंट पी.ए. चिल्लाळ , वर्क्स युनियन लीडर सचिन करंदीकर ,अडमिनीस्ट्रेशन ऑफिसर मीरा मिरजकर , अजिंक्य भोसले आणि द्रुप्स ऑफिसर यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

शाळेतील कर्णबधिर युनिटच्या शिक्षिका कुसुम पाडळे , अनुराधा अंबेकर , गंगाधर सोनवणे यांनी परिश्रम घेतले. सदर उपक्रमाचे कौतुक मुख्याध्यापक सतीश गवळी ,संस्थेचे उपकार्यवाह शरद इनामदार , संस्था कार्याध्यक्ष डॉ.गजानन एकबोटे ,सहकार्यवाह प्रा. ज्योत्स्ना एकबोटे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.