Dehuroad : भरधाव वाहनाच्या धडकेत रस्ता ओलांडणा-या नागरिकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – भरधाव वेगात आलेल्या वाहनाने रस्ता ओलांडणा-या नागरिकाला जोरदार धडक दिली. यामध्ये नागरिकाचा मृत्यू झाला. अज्ञात वाहनचालक घटनेची माहिती न देता पळून गेला. ही घटना देहूरोड-कात्रज बाह्यवळण महामार्गावर हॉटेल सॅन्टोसा समोर घडली.

सरदार विलास पोवार (वय 47, रा. पुनाळ, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2 सप्टेंबर 2018 रोजी सरदार रावेत येथील देहूरोड-कात्रज बाह्यवळण महामार्गावर हॉटेल सॅन्टोसासमोर सकाळी अकराच्या सुमारास रस्ता ओलांडत होते. त्यावेळी भरधाव वेगात आलेल्या एका वाहनाने त्यांना धडक दिली. यामध्ये सरदार गंभीर जखमी झाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

  • याबाबत देहूरोड पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरोधात स्वतः फिर्याद दिली. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.