Dehuroad : ‘सार्वजनिक स्वच्छतागृहाची स्वच्छता करा, अन्यथा डबा बजाओ आंदोलन’

एमपीसी न्यूज – आंबेडकरनगर येथील अशोक टॅाकिज जवळील सार्वजनिक स्वच्छतागृहाची दुरवस्था झाली असून येथून येणाऱ्या दुर्गंधीचा त्रास आसपासच्या नागरिकांना सहन करावा लागत आहे. या स्वच्छतागृहाची त्वरित दुरुस्ती करावी नाहीतर डबा बजाओ आंदोलन करण्यात येईल असा इशारा मानव आधार सामाजिक संघाचे उपाध्यक्ष रजाक शेख यांनी दिला आहे. 

_MPC_DIR_MPU_II

याबाबत देहू कॅन्टोन्मेंट बोर्डाला निवेदन दिले असून या स्वच्छतागृहाची स्वच्छता करावी अथवा या ठिकाणी नवीन स्वच्छतागृह बांधावे अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी संघाचे संस्थापक अध्यक्ष दशरथ शेट्टी, मावळ तालुका अध्यक्ष किरण गवळी, देहुरोड शहर अध्यक्ष संतोष दूधघागरे, दीपक मधुकर, प्रशांत जोगदंड इतर कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.