Dehuroad Corona Update : आज 50 रुग्णांना डिस्चार्ज ; 19 नवीन रुग्णांची नोंद; एक मृत्यू

आजपर्यंत हद्दीत एकूण 502  पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याचे कॅन्टोन्मेंट प्रशासनाकडून सांगण्यात आले. : Discharge to 50 patients today; Registration of 19 new patients; one death

एमपीसीन्यूज : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील काळोखे मळा, शिवाजीनगर, आंबेडकर नगर, गांधीनगर, जुना मुंबई पुणे रोड, मेन बाजार, किन्हई, गार्डन सिटी, अलकापुरी या परिसरात आज, सोमवारी एका दिवसात 19 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. तर आज कोरोनामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, आज तब्बल 50 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

आजपर्यंत हद्दीत एकूण 502  पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याचे कॅन्टोन्मेंट प्रशासनाकडून सांगण्यात आले.

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाच्या वतीने आज, सोमवारी रात्री नऊ वाजेपर्यंतचा कोरोना अहवाल प्रसिद्धीस  दिला आहे.

त्यामध्ये कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत 19 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाल्याचे म्हटले आहे.

रुग्णवाढीचे प्रमाण झोपडपट्टी भाग, बाजारपेठ आणि गावठाण भागातील असल्याचे या अहवालातून स्पष्ट होत आहे.

आजपर्यंत कॅन्टोन्मेंट हद्दीत  एकूण 502  पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यापैकी सध्या 29 रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत.

79 जण होम आयसोलेशनमध्ये आहेत. रुग्णालयात दाखल रुग्णांची आरोग्य स्थिती चांगली असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

महात्मा गांधी कोविड केअर सेंटर येथे 19 रुग्ण उपचार घेत आहे.  तर आज कोरोनामुळे आंबेडकर नगर येथील 72 वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे हद्दीतील कोरोना मृतांची संख्या 15 इतकी आहे.

दरम्यान,  आज 50 रुग्णांना घरी सोडण्यात आले. आजपर्यंत कोरोना आजारातून बरे झालेल्या एकूण 360 रुग्णांना घरी सोडण्यात आल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनीता जोशी यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.