Dehuroad : सामूहिक नळावर पाणी भरण्यावरून वाद

एमपीसी न्यूज – सामूहिक नळावर पाणी भरण्यावरून वाद झाला. यामध्ये एका तरुणाने महिलेच्या डोक्यात वीट फेकून मारली. ही घटना मंगळवारी (दि. 5) दुपारी बाराच्या सुमारास शिंदेचाळ, देहूरोड येथे घडली.

बेबी दादू गायकवाड (वय 47, रा. शिंदेचाळ, देहूरोड) असे जखमी महिलेचे नाव आहे. त्यांनी या प्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी ओमकार शाहू राजे (वय 22) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी फिर्यादी आणि आरोपी यांच्यामध्ये सामूहिक नळावर पाणी भरण्यावरून भांडण झाले. त्यामध्ये शाब्दिक वाद झाला. तिने फिर्यादी यांना वीट फेकून मारली. यामध्ये फिर्यादी यांच्या डोक्याला मुक्का मार लागला. हे भांडण सोडविण्यासाठी फिर्यादी यांची मुलगी आली असता या भांडणात तिच्या गळ्यातील मंगळसूत्र पडून गहाळ झाले. पोलिसांनी ओंकार याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.