Dehuroad : अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी निमित्त 1000 हजार कथा कादंबऱ्या, शंभर किलो लाडू व 100वृक्ष रोपांचे वाटप

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना जन्मशताब्दी निमित्त व लोकमान्य टिळक यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आले. : Distribution of 1000 thousand story novels, 100 kg laddu and 100 tree saplings on the occasion of Anna Bhau Sathe's birth centenary

एमपीसीन्यूज : बहुजन विकास आघाडी देहूरोड शहर आणि देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड यांच्या संयुक्त विद्यमाने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना जन्मशताब्दी निमित्त व लोकमान्य टिळक यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आले. तसेच शंकर मंदिराजवळ आयोजित जन्मशताब्दी महोत्सवात अण्णा भाऊ साठे यांच्या कथा-कादंबऱ्या व त्यांच्या 1000 हजार साहित्य, शंभर किलो लाडू आणि 100वृक्ष रोपांचे वाटप करण्यात आले.

कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. या वेळी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामस्वरूप हरितवाल यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

तर कामगार नेते लहूमामा शेलार यांच्या हस्ते लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.

मुख्य कार्यकारी अधिकारी हरितवाल यांनी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दीनिमित्त अण्णा भाऊंच्या साहित्यासह त्यांच्या कार्याची माहिती माहिती दिली. संयोजक संजय धुतडमल यांनी मनोगत व्यक्त केले.

कॅन्टोन्मेंट बोर्डाचे नगरसेवक हाजीमलंग मारीमुत्तू, गोपाळ तंतरपाळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष कृष्णा दाभोळे यांच्यासह बोर्डाचे कर्मचारी व बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते. संजय धुतडमल यांनी सूत्रसंचालन केले, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे कार्यालय अधीक्षक राजन सावंत यांनी आभार मानले.

बहुजन विकास आघाडीच्या वतीने शंकर मंदिराजवळील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नियोजित उद्यान येथे अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते ‘अण्णा भाऊं’च्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

तसेच आमदार शेळके यांच्या हस्ते अण्णा भाऊ साठे यांच्या कथा-कादंबऱ्या व त्यांच्या 1000 हजार साहित्य, शंभर किलो लाडू आणि 100वृक्ष रोपांचे वाटप करण्यात आले.

पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर, नगरसेवक हाजीमलंगमारीमुत्तू, गोपाळ तंतरपाळे, अतुल मराठे, कृष्णा दाभोळे, भाजपाचे शहराध्यक्ष बाळासाहेब शेलार, मिकी कोचर, प्रवीण झेंडे, कॅन्टोन्मेंटच्या माजी प्रशासक सुनंदा आवळे, भाजपा महिला शहराध्यक्ष सारिका मुथा, शिवसेना मावळ तालुका समन्वयक रमेश जाधव, राजाराम अस्वरे,  विकी जाधव, सूर्यकांत सूर्वे, सुनील गायकवाड, जेष्ठ शिवसैनिक देवा कांबळे, कामगार नेते अरुण गोंटे आदी उपस्थित होते.

आमदार शेळके यांनी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या कार्याचा गौरव केला. अण्णा भाऊंच्या नावाने होणाऱ्या नियोजित उद्यानास कितीही खर्च लागला तरी तो करण्यास तयार आहे. अशा महापुरुषांच्या नावाने हे उद्यान पूर्ण झाले पाहिजे.

या उद्यानात ग्रंथालय निर्माण करण्यासाठी कटिबद्ध असून, या कामासाठी शक्य ती मदत केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

यावेळी गोपाळ तंतरपाळे, कृष्णा दाभोळे, सुनंदा आवळे, सारिका मुथा, प्रवीण झेंडे, संजय धुतडमल यांनी मनोगत व्यक्त केले.

सूत्रसंचालन बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष संजय धुतडमल यांनी केले. संतोष खुडे यांनी आभार मानले.

शफी शेख, विजय नवगिरे, बन्सी गायकवाड, नितीन गजभिव, गौरव जेगरे, कैलाश वारके, संजय साठे, शेषनारायण पवार, राजू नवगिरे, शिवा कोळी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.