BNR-HDR-TOP-Mobile

Dehuroad : विवाहितेला इमारतीवरून ढकलून जीवे मारण्याचा प्रयत्न; तिघांवर गुन्हा

0

एमपीसी न्यूज – विवाहितेचा शारीरिक मानसिक छळ करून तिचा गर्भपात केला. तसेच तिला इमारतीवरून ढकलून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना देहूगाव येथे मंगळवारी (दि. 3) घडली. याप्रकरणी पती, सासू आणि नणंदेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पती श्याम गजानन वाघमारे (वय 24), सासू शोभा गजानन वाघमारे (वय 60), नणंद दीपाली गजानन वाघमारे (वय 30, सर्व रा. देहूगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी मोनाली श्याम वाघमारे (वय 22) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 14 जून 2016 ते 3 डिसेंबर 2019 या कालावधीत ही घटना घडली. आरोपींनी फिर्यादी विवाहितेला घरगुती किरकोळ कारणांवरून शिवीगाळ व मारहाण केली. त्यानंतर फिर्यादी महिलेचा जबरदस्तीने गर्भपात केला. शारीरिक व मानसिक त्रास देत मंगळवारी महिलेला इमारतीवरून ढकलून देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. असे फिर्यादीत म्हटले आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3