Dehuroad : माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज – माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत पती दारू पिऊन पत्नीला मारहाण करत असे. याचा पत्नीच्या भावाने बेवड्या पतीला जाब विचारला. या कारणावरून पतीने पत्नीच्या भावाला लोखंडी रॉडने मारहाण केली. ही घटना देहूरोड येथे घडली. याप्रकरणी बेवड्या पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सतीश शामराव पवार आणि अन्य तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी 30 वर्षीय पीडित विवाहितेने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

  • याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतीश आणि त्याच्या घरचे पीडित महिलेकडे माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत होते. सतीशने दारू पिऊन महिलेला मारहाण करत तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. हा प्रकार महिलेने भावाला सांगितला.

फिर्यादी महिलेच्या भावाने सतीशला मारहाण करण्याचा जाब विचारला. यावरून सतीशने महिलेच्या भावाला लोखंडी रॉड डोक्यात मारून जखमी केले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.