Dehuroad : कॅन्टोन्मेंटची मतदार यादी पाहण्यासाठी 31जुलै पर्यंत मुदतवाढ द्या : ॲड. कृष्णा दाभोळे

Extend till 31st July to view cantonment voter list: Adv. Krishna Dabhole

एमपीसीन्यूज : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून प्रसिद्ध करण्यात आलेली प्राथमिक मतदार यादी सर्व नागरिकांना पाहता यावी, यासाठी ती बोर्डाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी. त्याचबरोबर सध्या सुरु असलेल्या लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर मतदार यादी पाहण्यासाठी 31  जुलैपर्यंत मुदतवाढ द्यावी,  अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष ॲड. कृष्णा दाभोळे यांनी केली आहे.

यासंदर्भात ॲड. दाभोळे यांनी देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकरी रामस्वरूप हरितवाल यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून नुकतीच सातही वॉर्डांची प्राथमिक मतदार यादी   प्रसिद्ध केली.

कॅन्टोन्मेंट हद्दीतील नागरिकांना पाहण्यासाठी ही मतदार  यादी  बोर्ड कार्यालयात उपलब्ध करण्यात आली आहे.

मात्र, सध्या देहूरोड परिसरातील  कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि कॅन्टोन्मेंट प्रशासनाने 5 ते 8 जुलै आणि 13 जुलै ते 23 जुलै या कालावधीत लॉकडाऊन लागू केला आहे.

त्यामुळे सर्व नागरिक या लॉकडाऊनचे पालन करीत आपापल्या घरी आहेत. त्यामुळे यादी पाहणे, यादीत नावे समाविष्ट करणे, नावात दुरुस्ती करणे, हरकती आणि दावे ही कामे 20 जुलै या मुदतीत शक्य होणार नाहीत.

सध्याच्या लॉकडाऊन बाबत दिल्ली येथील रक्षा संपदा विभाग आणि पुण्यातील दक्षिण कमान या कार्यालयांना माहिती द्यावी. तसेच लॉकडाऊनमुळे 23  जुलै पर्यंत नागरिकांना मतदार यादी पाहणे श्यक्य नसल्याचे कळवावे.

त्याचबरोबर विशेष बाब म्हणून मतदार यादी पाहण्यासाठी 31  जुलै पर्यंत मुदतवाढ द्यावी. नागरिकांच्या सोयीसाठी ही यादी  बोर्डाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करावी, असे ॲड. दाभोळे यांनी निवेदनात नमूद केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.