Dehuroad : ‘रिटायरमेंटचे पैसे का देणार नाही’ म्हणत वडिलांना मारहाण; मुलांवर गुन्हा दाखल

Father beaten for saying 'why not pay retirement money '; Filing a crime against children : ही घटना मंगळवारी (दि. 28) सकाळी साडेदहा वाजता पोटरचाळ, देहूरोड येथे घडली.

एमपीसी न्यूज – ‘रिटायरमेंटचे पैसे का देणार नाही’, असे म्हणत दोन्ही मुलांनी जन्मदात्या वडिलांना लोखंडी रॉडने मारहाण केली. यामध्ये वडील गंभीर जखमी झाले. ही घटना मंगळवारी (दि. 28) सकाळी साडेदहा वाजता पोर्टर, देहूरोड येथे घडली. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही मुलांवर गुन्हा दाखल केला आहे.

योगेंद्र हिरानंद तेलगु (वय 32), दिनेश हिरानंद तेलगु (वय 30, रा. पोर्टर  चाळ, देहूरोड) अशी गुन्हा दाखल झालेल्या मुलांची नावे आहेत. याप्रकरणी त्यांचे वडील हिरानंद चंदाप्पा तेलगु (वय 61) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हिरानंद हे एका सरकारी विभागातून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्या निवृत्तीनंतर त्यांना एकत्र काही रक्कम मिळणार आहे. त्या पैशांवर आरोपींचा डोळा होता.

हिरानंद यांना मिळणार असलेले पैसे आरोपींनी मागितले. त्यास हिरानंद यांनी नकार दिला असता आरोपींनी आपसात संगनमत करून शिवीगाळ करत लोखंडी रॉडने मारहाण केली. यामध्ये हिरानंद यांच्या डोक्याला, डोळ्याला, बरगड्यांना दुखापत झाली आहे.

देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.