Dehuroad : जागेच्या मालकी वादावरून बाप लेकाला मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल

Father -son beaten over land ownership dispute; Charges filed against three

एमपीसी न्यूज – दोन घरांच्यामध्ये असलेल्या जागेवर मालकी सांगत तिघांनी मिळून बाप-लेकाला बेदम मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. 23) रात्री साडेसहा वाजता अभंगनगरी, देहूगाव येथे घडली. याबाबत सोमवारी (दि. 25) देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजेंद्र दादाराम मोरे (वय 40, रा. अभंगनगरी, देहूगाव), ओमकार राजेंद्र मोरे अशी जखमींची नावे आहेत. याप्रकरणी राजेंद्र मोरे यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी कालिदास कोल्हे (वय 35), विठ्ठल सोनवणे (दोघे रा. अभंगनगरी, देहागाव), कात्रे (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजता आरोपी कालिदास दारू पिऊन फिर्यादी राजेंद्र यांच्या घराजवळ आला. त्याने राजेंद्र आणि त्यांच्या परिवाराला जागेच्या कारणावरून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

राजेंद्र यांनी कालिदास याला ‘शिवीगाळ का करतो’ असे म्हटले. यावरून सर्व आरोपींनी मिळून राजेंद्र यांना शिवीगाळ करत धमकी दिली. कालिदास याने रस्त्यावर पडलेला दगड उचलून राजेंद्र यांना मारला. त्यामुळे राजेंद्र यांच्या डोक्यात आणि पाठीत गंभीर दुखापत झाली.

आरोपी विठ्ठल आणि कात्रे या दोघांनी राजेंद्र यांचा मुलगा ओमकार याला लाथाबुक्यांनी मारहाण केली. ‘माझ्या आणि तुझ्या घराच्या दरम्यान असलेली मोकळी जागा ही केवळ माझी आहे. त्यावर तुझा वावर मला नकोय’ असे म्हणून कालिदास आणि अन्य आरोपी राजेंद्र आणि ओमकार यांना मारून निघून गेले.

देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like