Dehuroad: गुटखा खाऊन अंगावर थुंकल्याचा जाब विचारणा-या बाप-लेकाला मारहाण

Father son duo beaten up after they objected for spitting on them

एमपीसी न्यूज – गुटखा खाऊन अंगावर थुंकणा-याला जाब विचारल्याच्या कारणावरून दोघांनी मिळून जाब विचारणा-या बाप लेकाला बेदम मारहाण केली. ही घटना गुरुवारी (दि. 23) रात्री साडेसात वाजताच्या सुमारास दत्तनगर, किवळे येथे घडली.

अभिजित प्रकाश चव्हाण (वय 27, रा. किवळे) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी देवा जमादार आणि त्याच्या साथीदारावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री आरोपी देवा हा अभिजित यांच्या अंगावर गुटखा खाऊन थुंकला. याचा अभिजित यांचे वडील प्रकाश चव्हाण यांनी देवा याला जाब विचारला. यावरून आरोपी देवा आणि त्याच्या साथीदाराने प्रकाश यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

ही भांडणे सोडविण्यासाठी फिर्यादी अभिजित आले असता त्यांना देखील वीट आणि दगडाने मारले. यात अभिजित यांच्या डोळ्यावर, हातावर गंभीर दुखापत झाली. त्यानंतर अभिजित यांचा भाऊ भांडणे सोडविण्यासाठी आला असता आरोपींनी त्याला देखील लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. जमलेल्या लोकांना आरोपींनी शिवीगाळ केली आणि घटनास्थळावरून निघून गेले. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.