Dehuroad : सुनेला घरात घेण्यावरून बाप-लेकाचे भांडण; वडिलांकडून मुलावर वार

एमपीसी न्यूज – सुनेला   घरात घ्यायचे किंवा नाही या कारणावरून बाप-लेकांमध्ये तुंबळ भांडण झाले. यात वडिलांनी मुलावर धारदार शस्त्राने वार करून जखमी केले. ही घटना गुरुवारी (दि. 21) दुपारी कुंभार चाळ, देहूरोड रेल्वे स्टेशनजवळ घडली.

स्वप्नील सुरेश सांबरे (वय 25, रा. कुंभार चाळ, देहूरोड रेल्वे स्टेशनजवळ, देहूरोड) असे जखमी मुलाचे नाव आहे. त्याने याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुरेश हरी सांबरे (वय 56) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास फिर्यादी स्वप्नील आणि त्यांचे वडील आरोपी सुरेश यांच्यात स्वप्निल यांच्या पत्नीला घरात घेण्याच्या कारणावरून वाद झाला. हा वाद विकोपाला जाऊन त्यांचे भांडण झाले.

यात सुरेश यांनी मुलगा स्वप्नील याच्यावर धारदार शस्त्राने वार करून दुखापत केली. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.