Dehuroad : कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालयाच्या प्रांगणात रघुवीर शेलार यांच्या हस्ते ध्वजारोहण

कोरोना योद्धयांसह दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान. : Flag hoisting by Raghuveer Shelar in the premises of Cantonment Board Office

एमपीसीन्यूज : स्वातंत्र्यदिनानिमित्त देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मुख्य कार्यालयात देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष रघुवीर शेलार यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.  यावेळी कोरोना योद्धयांसह  दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी कॅन्टोन्मेंट बोर्डचे अध्यक्ष ब्रिगेडिअर संजय खन्ना, मुख्य कार्यकारी अधिकारी रामस्वरूप हरितवाल, नगरसेवक विशाल खंडेलवाल, हाजीमलंग मारीमत्तू, अरुणा पिंजण, सारिका नाईकनवरे,  कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अधिकारी, कर्मचारी, पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच देहूरोड शहरातील राजकीय पक्षाचे अध्यक्ष, पदाधिकारी तसेच नागरिक व पत्रकार उपस्थित होते.

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचा पाच वर्षातील कामाचा लेखाजोखा रघुवीर शेलार यांनी मांडला. कोरोना योद्धयांसह व दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर संत तुकाराम नगर, थाॅमस काॅलनी येथे बोर्डाचे उपाध्यक्ष   शेलार यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.  उद्योजक विलास शिंदे, दिनेश सिंग, मालाताई महिला बचत गटातील महिला आदी उपस्थित होते.

कोटेश्वरवाडी येथील सरसेनापती उमाबाई दाभाडे प्राथमिक शाळेतही बोर्डाचे उपाध्यक्ष शेलार यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.   श्रीकांत दाभाडे, अमोल शेलार, अभिषेक शेलार, दिनेश शेलार व शिक्षक वर्ग उपस्थित होते. यंदा प्रभमच विद्यार्थ्यांविना स्वतंत्र दिन साजरा झाला.यावेळी विद्यार्थ्यांची उणीव प्रकर्षाने जाणवली.

शेलारवाडी येथील स्वामी विवेकानंद प्राथमिक शाळेतही बोर्डाचे उपाध्यक्ष शेलार हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी मुख्याध्यापिका सुनंदा शेलार, विजय माळी, लक्ष्मी शेलार, उषा माळी उपस्थित होते. रघुवीर शेलार यांच्या हस्ते उपस्थित शिक्षक आणि सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.